राष्ट्रीय पक्षी मोराची तस्करी थांबणार का...?
नांदुरी/माय मराठी एक्सप्रेस
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले व निसर्गरम्य पर्यटन स्थान म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेले अहिवंतवाडी जंगलाच्या परिसरात व आसपास असलेल्या डोंगराच्या परिसरात रात्रीच्या वेळेस राष्ट्रीय पक्षींच्या जीवाला धोका असल्याचे ग्रामस्थांनी वन्य अधिकाऱ्यांना तक्रार करून सुद्धा वन अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेले जंगल, सप्तशृंगी घाट रस्ता, मार्कंडे पिंपरी, अहिवंत वाडी, चंडिकापूर, भातोडे, मार्कंडे बारी, या सर्व भागात व अशा इत्यादी ठिकाणी कमी जास्त प्रमाणात जंगल आहे जंगलात राष्ट्रीय पक्षी मोराचे प्रमाण सर्वाधिक असून या जंगलात बिबट्या, लांडगे, अजगर, माकडे, रान मांजर, रान डुक्कर, उदमांजर, कोल्हे, तीतर, व तसेच फेसर, लावरी, रान घुबड, बगळे, आदी प्रकारच्या पक्ष्यांचा व वन्य प्राण्यांचा वावर आहे.
स्थानिक आदिवासी बांधव वनविभागाच्या हद्दीत असलेले जंगल राखून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे अन्न पाणी, निवारा व भटकंतीसाठी मोकळे रान असल्यामुळे परिसरातील जंगलात मोरांचे वास्तव्य वाढू लागले आहे गावातील ग्रामस्थ मोरांचे संगोपन करण्यासाठी पुढाकार घेत असल्याने मोरांच्या वास्तव्याचा प्रश्न सुटून मोर बिनधास्तपणे भटकंती करतात तरी त्वरित बंदोबस्त करावा परिसरातील जंगलाचा दिवसेंदिवस -रास होत आहे . या जगंलातील वन्यप्राण्यासह मोरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून , यामुळे मोरांचे स्थलांतर होण्याची भीती व्यक्त होत आहे . वन विभागाने करडी नजर ठेवून वेळीच मोरांची तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे .
बंदुकीच्या आवाज -
गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अहिवंतवाडी घाट जंगलात बदुकीचा आवाज , मोरांच्या जोर - जोराने ओरडण्याचा आवाज कानी पडतो . त्यामुळे काही लोकांकडून मोरांची शिकार होत असल्याची शक्यता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत . रात्रीच्या वेळी हे लोक या भागात जाळी लावून दडी मारून बसत असून मोरांची तस्करी होत आहे . या परिसरातील जंगलाकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे असा ग्रामस्थांचा आरोप होत आहे.
विठ्ठल भरसट , पायरपाडा |
अहिवंतवाडी जगंलाशेजारीच माझी शेती असून गेल्या पंधरा दिवसांपासून जगंलातून बंदुकीचा तसेच मोरांच्या ओरडण्याचा आवाज येतो . या जगंलातून मोरांची तस्करी होत असल्याची शक्यता असून याबाबत स्थानिक वॉचमनकडे तक्रार केली असता , दिंडोरी नाशिकला तक्रार करण्याबाबत सांगत आहे .
संदीप बेनके , सामाजिक कार्यकर्ते , सप्तशृंगी गड |
सप्तशृंगी गड , मार्कंडेय पर्वत व अहिवंतवाडी किल्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलामुळे परिसराचे निसर्गसौदर्य अवलंबून आहे . या जंगलात असलेले वन्यप्राणी , पक्षांचा वावर , आर्युवेदिक वनस्पती मोठ्या प्रमाणात आहे . मात्र वनविभागाकडून काही वर्षांपासून वन संवर्धनाऐवजी जंगलाचा -रास होत असल्याचे दिसत आहे . वन्यप्राणी पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे .
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....