सप्तशृंगी गड | आई सप्तशृंगी चे मंदिर उघडणार का ...?

0
सप्तशृंगी गडावरील व्यापारी व ग्रामस्थांचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना साकडे...

सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
            साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेले श्री सप्तशृंगी गड हे कोणाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून व आत्ताच्या चार महिन्यांपासून बंद असलेले उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ व व्यापारी वर्गणी पालकमंत्री श्रीयुत छगन भुजबळ यांच्याकडे घेतली धाव मंदिर बंद असल्याने सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ व व्यापाऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे .
            या संकटाचा सामना आम्ही कसा करायचा व सरकारकडून आम्हाला काही मदत मिळेल का असे असे निवेदन सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ व व्यापारी वर्गाने पालक मंत्री श्री छगन भुजबळ यांच्याकडे दिले यावेळेस पालकमंत्र्यांनी सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांना व व्यापारी वर्ग सांगितले की हे निवेदन मी पुढे मुख्यमंत्र्यांकडे पाठवून त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची मी त्यांच्याकडे मागणी करेन.
            श्री क्षेत्र सप्तशृंगी गड हे तीर्थक्षेत्र असून सर्व संपूर्ण दुर्गम व गरीब लोक वस्ती असलेले एक पर्यटक स्थळ सुद्धा आहे त्यामुळे सप्तशृंगगडावर अनेक लोक हे हातावरती पोट घेऊन रोज वरच्या दुकानाच्या कमाई वरच आहे व ही कमाई संपुर्णपणे आई सप्तशृंगी च्या मंदिरावर अवलंबून आहे व ती म्हणजे सप्तशृंगी गडावर ती येणारे भाविकांना लागणाऱ्या काही वस्तू व आई भगवतीचे पूजेचे साहित्य यावरच सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ व व्यापारी वर्ग अवलंबून आहेत व आई सप्तशृंगी चे मंदिर गेल्या चार महिन्यांपासून व आधीच्या आठ महिन्यामुळे सप्तशृंगी गड हे बंद असल्याने येथील नागरिकांनी सरकार कडून काही मदत मिळावी नाहीतर आई भगवती चे मंदिर सरकारी नियमानुसार सुरू करावे म्हणजे आमचे उदरनिर्वाह थोड्या प्रमाणात का होईना सुरू होईल आता कारण आता ज्या व्यापाऱ्यांनी घरासाठी व्यापारासाठी बँकांमधून कर्ज घेतले होते त्या बँका आता अक्षरशः घरांना कुलूप लावण्याची नोटिसा बँकांनी ग्रामस्थांना दिल्या आहेत व महिलांना बचत गटाकडून जे काही व्यवसायाकरिता पैसे घेतले होते त्याचे हप्ते न पडल्यामुळे बचत गट वाले सुद्धा ग्रामस्थांना तगादा लावत आहेत अशा सर्व संघटना सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ व व्यापारी हे हैराण झाले असून पालकमंत्र्यांकडे ग्रामस्थांनी अक्षरशः साकडे घातले की आई आंबे चे मंदिर लवकरात लवकर उघडावे नाहीतर या बँका व बचत गटांना तरी काही आदेश देऊन मुदत वाढ करून द्यावी जेणेकरून ग्रामस्थांना थोडा का होईना दिलासा मिळेल आई सप्तशृंगी मंदिर व भाविकांच्या संबंधित असलेल्या विविध सेवासुविधा वरती आधारित आमचे अर्थचक्र आहे सप्तशृंगी गडावरील नागरिक बेरोजगारीमुळे कुटुंब सप्तश्रृंगी गडावरून स्थलांतरीत झाले आहे व आमच्या निवेदनाचा सहानुभूतिपूर्वक विचार करून आम्हाला दिलासा द्यावा असे म्हणणे व्यापारी वर्ग व गडावरील ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांकडे मांडले.
            निवेदन देतेवेळी सप्तशृंगी गड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री अजय दुबे, शांताराम गवळी, योगेश कदम, बंटी गुरव, संतोष तिवारी, कैलास सदगीर, ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी, दत्तू बर्डे, शांताराम सदगीर आदी उपस्थित होते.

MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !