वणी/माय मराठी एक्सप्रेस
दिनांक १७ जुलै २०२१ रोजी राज्यभरात इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला यामध्ये नाशिक जिल्ह्यातील वणी गावातील के.आर.टी.हायस्कूल वणी इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून मराठा विद्याप्रसारक समाज संस्था संचलित के.आर.टी.हायस्कूल वणी चा निकाल १०० टक्के लागला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतिहासातील आगळावेगळा निकाल माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने जाहीर केला या निकालात इयत्ता ९वीचे ५० गुण अंतर्गत सराव परीक्षेचे ३० गुण व अंतर्गत मूल्यमापन २० गुण असे एकूण १०० गुणांचे एकञिकरण करण्यात येऊन बेस्ट आँफ फाईव अंतर्गत हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.विद्यालयात सर्वात प्रथम येण्याचा मान कुमारी खांडे ऋतुजा चंद्रवदन ४८४+०३(९७.४०) हिने मिळविला तर द्वितीय क्रमांक महाले प्रिया राजेंद्र ४७३(९४.६०) तृतीय काळे वेदिका कैलास ४६५+०३(९३.६०)चतुर्थ राऊत यशश्री परशराम ४५८+०७(९३)पुरकर अक्षदा रामदास व पवार प्रिया सुनिल यांनी (९२.८०) यांनी संयुक्त पणे पाचवा क्रमांक मिळविला.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार संचालक दत्ताञय पाटील स्कूल कमिटीचे अध्यक्ष विलासराव कड सर्व स्कूल कमिटी सदस्य विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.बी.चंदन उपमुख्याध्यापक आडसरे पर्यवेक्षिका श्रीमती पाटील डी.के.टोपले आर.ए.भरसट एस.एल.कड श्रीमती शिंदे एस.डी.मोरे पी.व्ही.पानपाटील भुरकूड यांसह सर्व शिक्षक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....