सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर ती झाला शिवराज्याभिषेक सोहळा साजर...
श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही साजरा केला गेला शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा शिवराज्याभिषेक सोहळा हा यावर्षी शासनाने घालून दिलेले सर्व नियमा नुसार साजरा केली श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर आई सप्तशृंगीच्या कृपाआशीर्वादाने व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने गेल्या महिनाभरापासून ग्रामपंचायतीच्या दक्षतेने व आरोग्य केंद्राच्या सहकार्याने सप्तशृंगी गड हे कोरोणा मुक्त झाले आहे दिनांक ६ जून २०२१ रोजी सप्तशृंगी गडावरती ग्रामपंचायत तर्फे शिवराज्याभिषेक सोहळा हा उत्साहात साजरा केला गेला.
शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत असताना ग्रामपंचायत सरपंच रमेश पवार व ग्रामपंचायत सदस्य यांनी ग्रामपंचायत इमारती वरती ध्वजाची पूजा ही पुरोहित विलास दीक्षित यांच्यामार्फत विधीपूर्वक पूजा करून भगवा ध्वज फडकविला व ध्वजाला मानवंदना दिली यावेळेस सप्तशृंगी गडावरील ग्रामपंचायतचे सरपंच रमेश पवार यांनी ग्रामस्थांना असा संदेश दिला की गेल्या महिनाभरापासून सप्तशृंगगडावर कुठल्या प्रकारचे कोरोना रुग्ण नसल्याने गावकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही पण कोरोना पूर्ण पणे नष्ट न झाल्याने गावकऱ्यांनी कुठलाही हलगर्जीपणा करू नये प्रत्येकाने सॅनिटायझर चा वापर करावा व घराबाहेर कामाशिवाय पडू नये पडल्यास मास लावूनच घराबाहेर पडावे आणि परत घरी आल्यावर हात स्वच्छ धुवावे व आपल्या घरासमोर घाण होऊ नये याची सर्व ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. माझे कुटुंब माझे परिवार या संकल्पनेतून सर्वांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेऊनच वागावे यावेळेस सप्तशृंगी गडावरील ग्रामपंचायतचे सरपंच रमेश पवार, ग्रामसेवक देवरे ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी, ग्रामपंचायत सदस्य सौ. मनीषा गवळी, उपसरपंच सौ. गायकवाड, शिवसेना ग्राहक कक्ष चे शहर प्रमुख महेश पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी अजय बेंडकुळे, सुरेश पिसू आदी उपस्थित होते.
याचप्रमाणे श्री सप्तशृंगी गडावरील भवानी चौकामध्ये विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ बेनके यांनीही शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन केले व ज्योतिषाचार्य पाठक गुरुजी यांनी शिवछत्रपतींच्या प्रतिमेची विधीपूर्वक पूजा केली हा सर्व सोहळा शासनाने घालून दिलेले सर्व नियमा नुसार मोजक्याच लोकांमध्ये हा सोहळा साजरा केला गेल्याने ग्रामस्थांनी थोडी नाराजी व्यक्त केली याचे कारण म्हणजे सप्तशृंगी गडावर दरवर्षी मोठ्या उत्साहात व ढोल-ताशाच्या गजरात शिवराज्याभिषेक सोहळा हा साजरा केला जातो पण या वर्षी ढोल ताशा च्या गजरात साजरा न करता आल्यामुळे ग्रामस्थांनी थोडी नाराजी व्यक्त केली याप्रसंगी शिवप्रेमी नवनाथ बेनके, राजेंद्र अष्टेकर, संदीप बेनके, निलेश साळुंखे, निवृत्ती बागुल, सरपंच रमेश पवार, गणेश राऊत, समीर तडवी, लक्ष्मण कुलकर्णी, राजेंद्र पवार, गिरीश गवळी व इतर शिवप्रेमी उपस्थित होते.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....