सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरती जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण करून सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त संस्थेचे नवनिर्वाचित अधक्ष मा. श्रीवर्धन पी देसाई यांनी ट्रस्टच्या पदभार स्वीकारला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर दरवर्षी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट चे विश्वस्त, अध्यक्ष व कर्मचारी हे श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर वृक्षरोपण करत असतात व अनेक ठिकाणी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट तर्फे वृक्षारोपण हे केले जात असते व या वेळेसही जिल्हा न्यायाधीश २ व अति सत्र न्यायाधीश, नाशिक आणि सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट चे अध्यक्ष मा. श्रीवर्धन देसाई यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण करून सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष पद स्वीकारले.
श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण केले वृक्षारोपण करताना ट्रस्टचे अध्यक्ष यावेळेस असे म्हणाले की जगामध्ये ग्लोबल वॉर्निंग चे प्रमाण वाढत आहे व हे ग्लोबल वार्मिंग चे प्रमाण कमी करण्याकरिता संपूर्ण देशवासीयांनी वृक्षरोपण हे केले पाहिजे एक व्यक्ती एक वृक्ष या संकल्पनेने प्रत्येक व्यक्तीने वृक्षरोपण केले गेले पाहिजे व या वृक्षाची जोपासणे केली पाहिजे जेणेकरून जगावरती ग्लोबल वार्मिंग चे प्रमाण कमी होईल व प्रकृतीला एक मानवा तर्फे हातभार लागेल दरवेळेस माणसाने वृक्षरोपण केले तर निसर्गचक्र हे समान राहील असे यावेळेस अध्यक्षांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळेस जिल्हा न्यायाधीश २ व अति सत्र न्यायाधीश, नाशिक आणि सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट चे अध्यक्ष मा. श्रीवर्धन देसाई, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट चे विश्वस्त श्री. दीपक पाटोतकर, श्री. ललित निकम, सौ. मंजोत पाटील, श्री. प्रशांत देवरे, श्री. भूषणराज तळेकर, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, प्रकाश जोशी, नानाजी काकळीज, प्रकाश पगार, नरेंद्र महाले, प्रमोद देशमुख, किरण राजपूत, यशवंत देशमुख आदी उपस्थित होते.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....