सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
हाक तुमची साथ आमची या संकल्पनेतून सप्तशृंगी गडावरील ८०० ते १००० ग्रामस्थांकरीता दुपारच्या जेवणाची व्यवस्था...
श्री क्षेत्र सप्तशृंगी गड हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने सप्तशृंगी गडावर महिन्याकाठी लाखो रुपयाची उलाढाल ही लॉकडान पूर्वी होत असे पण गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊन असल्यामुळे सप्तशृंगी गडावरील अर्थचक्र हे पूर्णपणे ठप्प पडले आहे व सप्तशृंगी गड हे पूर्णपणे बंद असल्याने सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांना अनेक त्रासातून जावे लागत आहे सप्तशृंगी गडावर ती महिन्याकाठी लाखो रुपयाची उलाढाल होत असल्यामुळे गडावरील अनेक ग्रामस्थ हे फक्त आणि फक्त दुकान व्यवसायावरच अवलंबून आहे व हे सर्व ग्रामस्थ दुकानावरती अवलंबून असल्यामुळे आई भगवती चे मंदिर बंद असल्यामुळे व लॉकडान असल्या मुळे यांच्या वरती मोठे संकट कोसळले आहे.
श्री क्षेत्र सप्तशृंगी गड हे अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांना अनेक संकटांना मधून जावे लागत आहे त्याच पैकी एक म्हणजे अन्नधान्याची ही समस्या लॉकडान मुळे गडावरील संपूर्ण ग्रामस्थांवरती आली होती पण आई सप्तशृंगी लाच आपल्या लेकरांची काळजी असल्यामुळे आई सप्तशृंगी चे अनेक भक्त सप्तशृंगी गडावरती येऊन व सप्तशृंगी गडावरील अनेक ग्रामस्थांच्या मार्फत फुल ना फुलाची पाकळीची मदत सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांना करत आहे व त्यापैकी एक म्हणजे मराठा उद्योजक लोबीचे सरचिटणीस अशोक चव्हाण.
सप्तशृंगी गडावरील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय दुबे हे अनेक उपक्रम सप्तशृंगी गडावरती राबवत असतात जसे की ग्रामस्थांकरीता भाजीपाल्याचे वाटप, धान्याचे वाटप व यापैकीच एक म्हणजे त्यांच्या आईच्या स्मरणार्थ म्हणजे कै. गुलाबाई दुबे यांच्या स्मरणार्थ सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांना दुपारचे पोटभर जेवण देण्याचे प्रमाण यांनी केले आहे.
गेल्या १० दिवसांपासून सप्तशृंगी गडावरील ८०० - १००० ग्रामस्थांकरिता रोज घरपोच सेवा हे देत असतात व यामध्ये दुपारचे पोटभर जेवण असते हे जेवण मराठा उद्योजक लोबी आणि सप्तशृंगी गडावरील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय दुबे यांच्या आईच्या स्मरणार्थ गावकर्यां करिता गेल्या दहा दिवसांपासून घरपोच सेवा देण्यात येत आहे ही सेवा गडावरील ग्रामस्थांना दररोज दिली जात असल्याने गडावरील ग्रामस्थांना फुल ना फुलाची पाकळीची मदत होत आहे या सेवेमध्ये मराठा उद्योजक लोबी चे सरचिटणीस अशोक चव्हाण , सप्तशृंगी गडावरील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय दुबे, मनोज कदम, संजय जागीरदार, बंटी जागीरदार, सागर दुबे, संतोष तिवारी, यशवंत ठाकूर, विजय कासार आदींच्या मार्फत ही सेवा रोज सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांनी करिता घरपोच केली जात आहे.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....