सप्तशृंगी गड | कालाष्टमी निमित्य कोरोना चा नायनाट करण्यासाठी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व पुरोहितांनी केले होमहवन ...

0
सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस

            कालाष्टमी निमित्य कोरोना चा नायनाट करण्यासाठी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व पुरोहितांनी केले होमहवन.
            लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील देवी मंदिर हे कोरोणा महामारी मुळे बंद आहे व तसेच राज्यातील संपूर्ण देवस्थाने ही या कारणामुळे बंद आहेत.
            याच पार्श्वभूमीवर आणि कलआष्टमी निमित्त श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व पुरोहित यांनी महापूजा आणि महायज्ञ करून कोरोणाची महामारी या विश्वातून नाहीशी व्हावी यासाठी आई भगवती ला साकडे घातले आणि अष्टमी निमित्य होम करून या महामारी चा नायनाट होऊ दे अशी भगवती पुढे प्रार्थना केली साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगी गड हे काही महिन्यांपासून बंद असल्यामुळे श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर अनेक ठिकाणाहून अन्नधान्याचा पुरवठा सप्तशृंगी गड ग्रामस्थांकरीता केला जात आहे त्यामध्ये सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट कडून ग्रामस्थांनकरीता जेवणाची सुविधा करण्यात आली आहे, ठाण्याचे खासदार श्रीकांत शिंदे , कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक नितीन निकम 
            सप्तशृंगी गडावरील ग्रामपंचायत सदस्य राजू गवळी आणि समाजसेवक दीपक जोरवर या सर्वांनी २५० ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले , समाज सेवक मयूर बेनके आणि समाजसेवक ईश्वर कदम यांनीही ग्रामस्थांत करिता जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
            गजानन महाराज मंदिर ट्रस्ट गोरेगाव (पश्चिम) मुंबई मंदिराचे मुख्य विश्वस्त डॉक्टर स्वरूप प्रामाणिक आणि भाग्यश्री प्रामाणिक यांच्यातर्फे सप्तशृंगी गडावरील ३०० कुटुंबानं करिता जीवनावश्यक वस्तूं वाटण्यात आल्या , कल्याण-डोंबिवली येथील भाविक सूर्यवंशी परिवाराने ५०० ग्रामस्थांन करिता जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
            सप्तशृंगी गडावरील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय दुबे व मराठा महासंघ नाशिक यांच्यामार्फत ही ग्रामस्थांकरीता सकाळचा नाष्टा व भाजीपाल्याची व्यवस्था केली जात आहे.
            फ्युनीकुलर रोपवेचे व्यवस्थापक राजीव लुंबा ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके यांनीही ५०० ते ६०० कुटुंबानं करिता जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले असे इत्यादी भाविकांनी सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांत करिता मदतीचा ओघ हा सुरू ठेवला आहे व आणखीनही भाविक सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांन करिता मदत करत आहेत त्याकरिता सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांनी या सर्वांचे आभार मानले आहे व आपल्या MY MARATHI EXPRESS तर्फे ही अनेक भाविकांना आव्हान करत आहोत की सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांना आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करावी जेणेकरून सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांना या कोरोणा काळात फुल ना फुलाची पाकळी चा आधार मिळेल त्यामुळे सप्तशृंगी गडावर पार्श्वभूमीवर पुरोहित, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, ग्रामस्थ व व्यापारी वर्गांचे अर्थचक्र पूर्णपणे ठप्प झाले आहे याकरिता सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व पुरोहित यांनी कालाष्टमी निमित्त आई भगवती समोर महायज्ञ करून या कोरोणाचा नायनाट कर व संपूर्ण जगाला सुखी ठेव अशी प्रार्थना केली आणि तुझ्या मंदिराचे द्वार लवकरात लवकर भावीकान करीत उघडे होऊदे अशी प्रार्थना ग्रामस्थ, पुरोहित आणि सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट तर्फे करण्यात आली.
            यावेळेस पुरोहित प्रसाद दीक्षित, पुरोहित मिलिंद दीक्षित, पुरोहित मिलिंद दीक्षित, पुरोहित शेखर देशमुख, पुरोहित भूषण देशमुख या पुरोहितांनी कालाष्टमी निमित्य आई आंबे समोर होम हवन पूजा संपन्न केली. आणि या कोरोना महामारी मध्ये सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांनी अनेक ग्रामस्थांन करिता एक आदर्श ठेवल्याचे आपल्याला दिसून येत आहे ज्यामध्ये संपूर्ण गाव एकजुटीने मदत कार्यास हातभर लावण्याकरिता व कोरोना ला हरविण्याकरिता संपूर्ण गाव एक जुटीने काम करीत आहे व गावाने असा निश्चय केला की आमच्या गावात आम्ही कोरोणाला हद्दपार केला आहेच पण पुन्हा गावात कोरोणाचा शिरकाव होऊ देणार नाही असे यावेळेस ग्रामस्थांनी व नेते मंडळींनी सांगितले.

MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !