सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
क्षेत्र सप्तशृंगी गडावर फॅनिक्युलर ट्रॉली मध्ये झाले ५०० ते ६०० कुटुंबानं करिता जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगी गड हे बंद असल्याने व राज्यातील संपूर्ण देवस्थाने सुद्धा बंद असल्याने अनेक धार्मिक स्थळां मधील राहणाऱ्या ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे व अनेक देवस्थान स्थळांमधील अर्थ चक्रही ढासळन्याचे दिसून येत आहे श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील अर्थचक्र ही पूर्णपणे ठप्प पडले आहे येथील अर्थव्यवस्था ही देवी मंदिरावरती अवलंबून आहे अर्थव्यवस्था पूर्णपणे देवी मंदिरा वरती अवलंबून असल्याने गडावरील व्यापारी वर्ग व आदिवासी बांधव आणि हातावरील कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
याच पार्श्वभूमीवर चालते-बोलते मदत केंद्र म्हणजे ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके यांनी तसेच फॅनिक्युलर ट्रॉली चे चेअरमन शिवशंकर लातुरे व त्यांचे ठाण्याचे मित्र तसेच फॅनिक्युलर ट्रॉली चे मॅनेजर राजीव लुंबा या सर्वांनी श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर फॅनिक्युलर ट्रॉलीच्या पटांगणात सरकारी नियमाचे पालन करीत गावकऱ्यांना व गोरगरीब ग्रामस्थांना ५०० ते ६०० कुटुंबांन करिता जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळेस सप्तशृंगी गडावरील ग्रामपंचायतचे सरपंच रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके,फॅनिक्युलर ट्रॉली चे मॅनेजर राजीव लुंबा, धनंजय गायकवाड, राहुल बेनके आणि इतर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते यावेळेस ग्रामपंचायतचे सरपंच रमेश पवार व सदस्य संदीप बेनके यांनी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर कोरोणाचे कोणत्याही प्रकारचे रुग्ण नाही व आम्ही आता कोरोणाला पूर्णपणे हद्दपार करू यासाठी सर्व गावकऱ्यांनी स्वच्छते चे पालन करण्यास ग्रामपंचायतीने विनंती केली.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....