सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी व सूर्यवंशी परिवारातर्फे 500 कुटुंबीयांन करिता जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर कोरोना च्या पार्श्वभूमीवर गेले कित्येक महिन्यांपासून लॉकडाऊन असल्यामुळे सप्तशृंगी गडावरील आदिवासी व व्यापारी वर्गाचे अतोनात हाल होत आहे सप्तशृंगी गड हे अनेक महिन्यांपासून बंद असल्याने येथे असलेल्या ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे याच अनुषंगाने सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांना अनेक सेवाभावी संस्था ट्रस्ट आणि अनेक भाविक ग्रामस्थांसाठी अन्नधान्याचे वाटप करत आहेत व केलं जात आहे आत्तासुद्धा आपल्या MY MARATHI EXPRESS तर्फे आपण सर्वांना विनंती केली आहे की महाराष्ट्रातील देवस्थान हे कधी सुरू होतील हे माहीत नसल्याने गडावरील ग्रामस्थांकरिता अजून धान्याचे वाटप करण्यात आले तर बरे होईल असे आव्हान आपल्या वेबसाईट व गडावरील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.
याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते दीपक जोरवरकर आणि माजी सरपंच राजेश गवळी यांनी कल्याण डोंबिवली येथील त्यांचे मित्र नगरसेवक नितीन निकम यांच्याशी फोनवर संपर्क साधून सप्तशृंगी गडावरील परिस्थितीचा आढावा कळविला व तात्काळ नितीन निकम व त्यांचे सहकारी यांच्याशी चर्चा करून ताबडतोब त्यांनी सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांत करिता जीवनावश्यक वस्तूंचे ५०० कुटुंबीयांन करिता तात्काळ अन्नधान्यांचे किडा पोस्त केले.
या आधीही नितीन निकम यांनी मागील महिन्यात सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांना २५० किटांचे वाटप केले होते व या वेळेस नितीन निकम व त्यांच्या मित्र परिवार यांनी गडावरील ग्रामस्थांना करिता पुन्हा एकदा ५०० कीटकांचे वाटप केल्याने सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ व व्यापारी वर्गाने नितीन निकम आणि सूर्यवंशी कुटुंबाचे यांचे खूप खूप आभार मानले यावेळेस कल्याण डोंबिवली येथील नगरसेवक नितीन निकम आणि त्यांचे मित्र सूर्यवंशी , ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी, दीपक जोरवर, गिरीश गवळी, योगेश कदम, दिलीप बर्डे, ईश्वर कदम, रवी कदम, बबलू गायकवाड, भूषण गवळी, आकाश गवळी, पवन गवळी, शांताराम सदगीर, रोशन गवळी, इत्यादी या वेळेस उपस्थित होते.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....