सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर लॉकडान काळातही मदतीला धावून आले गजानन महाराज मंदिर ट्रस्ट गोरेगाव (पश्चिम) मुंबई ....
श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर गेल्या दीड वर्षापासून ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे लॉक डाऊन च्या काळात श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर भाविक येण्यास मज्जाव असल्याने सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांवर अक्षरशा उपासमारीची वेळ आली आहे श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर उदरनिर्वाहाकरिता एकमेव मार्ग म्हणजे नारळ ओटीचे दुकान आहे व हे दुकाने गेल्या दीड वर्षापासून बंद असल्याने सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांवर अक्षरशहा बिकट परिस्थिती आली आहे याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते ईश्वर कदम यांनी गजानन महाराज मंदिर ट्रस्ट गोरेगाव (पश्चिम) मुंबई यांच्याशी संपर्क साधून गडावरील संपूर्ण परिस्थिती संस्थेला कळवली व गजानन महाराज मंदिर ट्रस्ट गोरेगाव (पश्चिम) मुंबई.
या संस्थेने सप्तशृंगी गडावरील परिस्थितीवर तातडीने निर्णय घेत ३०० कुटुंबानं करिता जीवनावश्यक वस्तूंच्या किटा या पाठवण्यात आल्या.
यामध्ये तूर डाळ, साखर, चहा पावडर, साबण, पीठ, मीठ इत्यादी असे जीवन उपयोगी वस्तू तसेच 300 कुटुंबीयांकडे प्राधान्य संस्थेमार्फत पाठवण्यात आले या धान्यांच्या किटा तातडीने सप्तशृंगी गडावर पाठवण्यात आल्या व सप्तशृंगी गडावरील गोरगरीब ग्रामस्थांना वाटण्यात आल्या यावेळेस ग्रामपंचायत वाटप करताना ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी, रोशन गवळी, दीपक जोरवर योगेश कदम, दिलीप बर्डे, ईश्वर कदम, बबलू गायकवाड, भूषण गवळी, आकाश गवळी, पवन गवळी, शांताराम गवळी हे उपस्थित होते.
यावेळेस ग्रामपंचायत सप्तशृंगी गड सदस्य संदीप बेनके यांनी गजानन महाराज मंदिर ट्रस्ट चे सवेकरांचा सत्कार करून आभार मानले.
MY MARATHI EXPRESS...
- राज रघुवीर जोशी...