सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे येथील कार्यरत समाजसेवक यांनी मदतीचा हात थोड्या प्रमाणात का होईना पुढे केल्याचे दिसून येत आहे.
श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर 80 टक्के आदिवासी समाज असल्यामुळे यांचे फुल, हार, साडी - ओटीचे दुकाने आहे लॉकडाऊन झाल्यामुळे सप्तशृंगी गडावर कुठल्याही प्रकारचे भाविक येत नसल्याने सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे काही समाजसेवक व यात्रेकरू यांनी थोड्या प्रमाणात का होईना सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांना मदतीचा हात पुढे केला आहे दिनांक १३ मे २०२१ रोजी सप्तशृंगी गडावरील समाज सेवक मयूर बेनके व मुंबईचे काही भाविक यांनी मिळून गावकऱ्यांसाठी ३५० कुटुंबांना किराणा किट वाटून ग्रामस्थांना थोडा दिलासा दिला आहे.
यावेळेस सरपंच रमेश पवार, समाज सेवक मयूर बेनके, विवेक बेनके, विजय बेनके, धनेश गायकवाड आदी उपस्थित होते.
MY MARATHI EXPRESS...
- राज रघुवीर जोशी...