सप्तशृंगी गड | आषाढी एकादशीनिमित्त विठू माऊली मंदिराची केली सजावट...
सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर आषाढी एकादशीनिमित्त भक्तांगणामध्ये गावकरी व सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट चे कर्मचाऱ्यांनी विठू माऊली च्या मंदिराची केलेली सजावट.
कोरोना च्या काळात सप्तशृंगी गडावरील काही ग्रामस्थांना विठू माऊली च्या पायी वारी साठी जाण्याचे आयोजन केले होते परंतु कोरोणाच्या निर्बंधाने हे जाणे होऊ शकले नसल्याने सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ व ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी गावातील भक्तांगणातील विठू माऊलीच्या मंदिरात ग्रामस्थ व गडावरील पुरोहित आणि सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट चे कर्मचारी यांनी मिळून विठू माऊली च्या मंदिराचे सजावट करून आणि महापूजा आरती करून विठूमाऊली कडे प्रार्थना केली की महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे लवकरात लवकर उघडू दे व पुढच्या वर्षी आम्हाला तुझ्या वारीला येण्याचे सुख लाभू दे आणि आई सप्तशृंगी च्या मंदिरात आई आंबेच्या चरणी नतमस्तक होऊ दे अशी मागणी या वेळेस संपूर्ण गावकऱ्यांनी केली.
यावेळेस पुरोहित प्रसाद दीक्षित व इतर पुरोहितांनी महापूजा आणि विठू माऊली ची आरती केली विठू माऊलीचे मंदिराला सजावट करण्याचे अनमोल सहकार्य देविदास वाघमारे, बत्तासे, गांगुर्डे, चंदू तुपे, अशोक खांडेकर, राजू गांगुर्डे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....