आदिमायेच्या श्री सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप...!
सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या अनेक उपक्रम हे राबविले जात असतात त्याचप्रमाणे यावेळेसही श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट च्या वतीने सप्तशृंगगड येथिल आदिवासी व गरजू इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
विश्वस्त संस्थेच्या वतीने विविध सामाजिक, पर्यावरण, आरोग्य, सेवाभावी, भाविक सेवा-सुविधा यासह विविध उपक्रम सातत्यपूर्वक आयोजित केले जातात. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला ट्रस्टच्या वतीने आदिवासी व ज्या गरीब विद्यार्थी-विद्यार्थिनीं यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करणे शक्य नाही व ते शिक्षणापासून वंचित राहतील अशा गरजू अश्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना नव्याने शैक्षणिक उपलब्धी होत आहे. विश्वस्त संस्थेच्या वतीने या प्रकारचे उपक्रम सुरु व्हावेत असा विश्वस्त संस्थेचा मानस आहे. त्यामुळे विश्वस्त संस्थेच्या वतीने एकूण ५५० विध्यार्थी-विध्यार्थीनीना ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री वर्धन देसाई यांच्या हस्ते शालेय साहित्याचे व ट्रस्टचे विश्वस्त अॅड. श्री. ललित निकम, अॅड. श्री. दिपक पाटोदकर, सौ. मनज्योत पाटील, डॉ. प्रशांत पाटील, श्री. भूषणराज तळेकर यांच्या उपस्थित केले गेले. तसेच व्यवस्थापक श्री. सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी श्री. भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी श्री. भिकन वाबळे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....