सप्तशृंगी गडावर काँक्रीट बांधावा लवकर व्हावा ग्रामस्थांची मागणी...
सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगीगडावर दरवर्षी उन्हाळा सुरु होताच भेडसावणारी पाणीटचाईची समस्या दूर करण्यासाठी नवीन गेटेड सिमेंट काँक्रिट बंधारा बांधण्यास प्रादेशिक जलसंधारण अधिकारी , मृद व जलसंधारण विभाग , नाशिक यांची तांत्रिक परवानगी मिळाली आहे . प्रस्तावित बंधाऱ्यांच्या जागेची मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली आहे . दरम्यान याबाबतचा अंतिम प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी दिली आहे . सप्तशृंगीगडावर दरवर्षी एप्रिल , मेव जून महिन्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते . गडावर तत्काळ नवीन सिमेंट बंधायास जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी मंजुरी द्यावी , अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी केली आहे .
सप्तशृंगीगडावर भवानी पाझर तलाव हा पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे. या पाझर तलावातील तीन वर्षांपूर्वी गाळ काढून खोली वाढविण्यात आली आहे . गळती थांबविण्याचेही काम करण्यात आले आहे ; मात्र दरवर्षी भाविकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गडावर उपलब्ध असलेले पाणी कमी पडत आहे. त्यामुळे २०१८ मध्ये श्री. गवळी यांनी जिल्हा नियोजन समितीकडे एक कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करून तीर्थक्षेत्र विकास किंवा आदिवासी उपाययोजनेतून निधी देण्याची मागणी केली होती. कृषिमंत्री दादा भुसे व आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून गेटेड सिमेंट काँक्रिट बंधाऱ्यासाठी १ कोटी ४१ लाख १६ हजार ४३२ रुपयांचा नवीन प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मृद व जलसंधारण उपविभाग सटाणा येथील अधिकारी आर ए. कोळगे, टी. आर. गुंजाळ, टी एस. गांगुर्डे, आर. बी. डोंगरे यांनी सप्तशृंगगडावर जागेची पाहणी केली आहे. विश्वस्त ललित निकम, डॉ. देवरे, मनजोत पाटील, भूषण राज तळेकर, दीपक पाटोदकर, सरपंच रमेश पवार, सदस्य राजेश गवळी, सदस्य दत्तू बडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय दुबे, योगेश कदम, शांताराम गवळी, आदी उपस्थित होते .
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....