लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आदिमायेचे शक्तिपीठ गुरुपौर्णिमा निमित्त सुना सुनाच ...
सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
गुरुपौर्णिमेनिमित्त दर वर्षी हजारो भाविकांच्या गर्दीने फुलणारा व आदिमायेच्या जयघोषाने निनादून जाणारा सप्तशृंगगड या वर्षी मात्र भाविकांविना सुना सुना होता . स्थानिक व परिसरातील भाविकांनी पहिल्या पायरीवरूनच आदिमायेच्या मंदिर कलशाचे व प्रतीकात्मक प्रतिमेचे दर्शन घेतले. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आदिमायेचे शक्तिपीठ सप्तशृंगगडावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीसुद्धा बंद असल्याने गुरुपौर्णिमेनिमित्त भाविक दर्शन घेऊ शकले नाहीत . दीड वर्षापासून देशात कोरोनाचा शिरकाव झाला आहे . ' ब्रेक द चेन ' उपक्रमात सरकारने धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता . परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आल्यानंतर गेल्या वर्षी १६ नोव्हेंबरला मंदिर सुरू झाले होते . त्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सरकारने लॉकडॉउन घोषित केल्याने ५ एप्रिलपासून मंदिर पुन्हा बंद करण्यात आले आहे .
दरम्यान , सकाळी साडेसातला न्यासाच्या कार्यालयापासून देवीची आभूषणे , सोन्याचा मुकुट , पादुकांची साध्या पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली . आदिमायेची पंचामृत पुरोहितांच्या हस्ते महापूजा झाली . स्थानिक व परिसरातील भाविकांनी पहिल्या पायरीवरूनच कलशाचे दर्शन घेतले . गडावरील गुरुदेव आश्रमातही गुरुपौर्णिमा उत्सव झाला . वणी येथील जगदंबामाता मंदिराच्या प्रवेशद्वारावरच भाविकांनी पूजन करीत दर्शन घेतले . मार्कंडेय पर्वतावर मार्कंडेय ऋषी मंदिर , पारेगाव येथील पाराशरी आश्रम , करंजी देवस्थान येथे भाविकांशिवाय धार्मिक विधी पार पडला .
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी...