सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ मानले जाणारे सप्तशृंगी गडावर मागील लॉकडाऊन पासून ग्रामस्थांवर हलाखीची परिस्थिती ओढावली आहे सप्तशृंगी गडावर दुकान हा एकमेव उत्पन्नाचा स्त्रोत असल्याने सप्तशृंगी गडावरील मागील लॉकडाऊन पासून भाविकांची येण्याची संख्या ही कमी झाली होती पण आता पुन्हा एकदा लॉकडाऊन झाल्याने सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांना मोठ्या हलाखीच्या परिस्थितीतून जावे लागत आहे मागील लॉकडाऊन मध्ये सप्तशृंगी गड हे तब्बल नऊ महिन्यांहून अधिक कालावधीमध्ये गडावर भाविक येत नसल्याने गडावरील ग्रामस्थांचे उदरनिर्वाह होणे कठीण झाले होते आहे व आता पुन्हा लॉकडाऊन झाल्याने ही परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे गावकऱ्यांच्या हाताला काम नाही व पोटाला पुरेसे अन्न नाही या परिस्थितीचा आढावा घेऊन सामाजिक कार्यकर्ते दीपक जोरवर व माजी सरपंच राजेश गवळी यांनी कल्याण चे माजी नगरसेवक नितीन निकम यांना सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांची परिस्थिती सांगितली.
त्यानुसार त्यांनी त्वरित निर्णय घेत ठाणे येथील शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्यामार्फत सप्तशृंगी गडावरील २५० कुटुंबांना १० दिवस पुरेल इतके अन्नधान्यांचे साहित्य पुरवले यामध्ये साखर, तूरडाळ तांदूळ, चहा पावडर, साबण आधी किराण्याचे वाटप करण्यात आले तसेच माजी दुय्यम निबंधक आशा भोये यांनी सप्तशृंगी गडावरील 60 कुटुंबांना याच प्रकारे किरणा चे वाटप केले.
त्यानंतर माजी उपसरपंच राजेश गवळी यांच्या वडिलांच्या कै. कारभारी रखमा गवळी यांच्या स्मरणार्थ चाळीस कुटुंबांना याच प्रकारे अन्नधान्याचे वाटप केले.
यावेळेस दीपक जोरवर, राजेश गवळी, नितीन निकम, दत्तू बर्डे, निलेश कदम, तुषार बर्डे, योगेश कदम, ईश्वर कदम, अजय दुबे आदी उपस्थित होते. या वेळेस सप्तशृंगी गडावर हे पूर्ण कार्य कोरोनाचे नेम राखून पार पाडण्यात आले व संपूर्ण गावाने श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांचे आभार मानले.
MY MARATHI EXPRESS...
- राज रघुवीर जोशी....