साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर चैत्र पौर्णिमे निमित्त भाविक शेकडो मैलांचा प्रवास, त्यात तळपणारा उन, शरीराची लाहलाह आणि उरात भगवतीच्या भेटीची ओढ घेऊन लाखोंच्या संख्येने खांदेशासह उत्तर महाराष्ट्रातून भाविक – भक्त पहाटे पासून आईच्या दर्शनासाठी पायरींमध्ये ठिकठिकाणी बाऱ्या लावून दर्शनासाठी भाविकांना टप्या - टप्याने सोडले जात होते. यावेळी भाविक भक्तानी सप्तशृंगी माता की जय, परशुराम बाला की जय, मार्कंडेय महाराज की जय असा जयघोष करीत सप्तशृंगगड परिसर दुमदुमून गेला होता. चैत्र पौर्णिमे निमित्त विविध धार्मिक पूजा-अर्चा यासह विश्वस्त संस्थेच्या कार्यालयातून महावस्त्र व अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सकाळची पंचामृत महापूजा मा. श्री. वर्धन पी. देसाई - विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा अति. सत्र न्यायाधीश, नाशिक यांनी सपत्नीक व देणगीदार भाविक श्रीमती गुलशन पटेल यांच्या हस्ते करण्यात आली. प्रसंगी विश्वस्त संस्थेचे विश्वस्त तथा तहसीलदार श्री बी ए कापसे, विश्वस्त अॅड. श्री. ललित निकम व्यवस्थापक श्री. सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी श्री. भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी श्री. भिकान वाबळे यांसह कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यांसह लाखोंच्या संख्येने भाविक - भक्त उपस्थित भाविकांपैकी १४ ते १५ हजार भाविकांनी प्रसादालयात मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला.
चैत्र उत्सव यात्रा यशस्वीतेसाठी मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सोमनाथ तांबे, पोलीस निरीक्षक श्री. समाधान नागरे, पोलीस उप निरीक्षक श्री. निकम, विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक श्री. सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी श्री भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक श्री. प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी श्री. भिकन वाबळे, सेवाभावी संस्था, ग्रामपंचायत पदाधिकारी यांसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….