ग्रामसेवक सुस्त ग्रामपंचायत मेंबर मस्त गावकरी व भाविक त्रस्त…
सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर आई आंबेच्या या पावन नगरीत सप्तशृंगी गड ग्रामपंचायतने दिनांक 26 ऑगस्ट 2021 रोजी श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर माझे गाव माझे कुटुंब या संकल्पनेतून सप्तशृंगी गडावर कीटक नाशक फवारणी ही केली याकरिता सप्तशृंगी गड ग्रामपंचायतने स्व मालकीचे 50 हजार रुपयेचे कीटक नाशक फवारणी यंत्र हे विकत घेतली व फवारणी यंत्र विकत घेतल्यानंतर सप्तशृंगी गडावर हे दिनांक 26 ऑगस्ट 2021 रोजी पहिल्यांदा किटकनाशकाची पेपर बाजी करत फवारणी करण्यात आली त्यावेळेस अनेक पत्रकारांना ग्रामपंचायत सदस्य यांनी मुलाखतीद्वारे समजून सांगितले माझे गाव माझे कुटुंब ही संकल्पना आपल्या गावामध्ये आपल्या घराप्रमाणे आपण राबवणार आहोत यामध्ये आपण दर पंधरा दिवसांनी जंतुनाशक फवारणी हि करणार आहोत व आपल्या गावात कोणत्याही प्रकारचे कोरोना बाधित रुग्ण हे आढळून नये व गाव हे कोरोना मुक्त कसे राहील व संपूर्ण गावात कोणतीही रोगराई होऊ नये याकरिता आपण दर पंधरा दिवसांनी श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर कीटकनाशक फवारणी करणार असल्याचे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले व गेल्या 5-6 महिन्यांपासून सप्तशृंगी गडावर हे कुठल्याही प्रकारची फवारणी केली जात नसल्याचे दिसून येत आहे व ग्रामपंचायत घेतले स्व मालकीचे फवारणी यंत्र हे ग्रामसेवकाच्या घरासमोर धूळ खात पडल्याचे दिसत आहे यामुळे गावातील अनेक नागरिकांचे असे म्हणणे झाले की गावामध्ये कोरोना महामारी वाढल्यानंतर किंवा दुसरी कोणती रोगराई हे गावांमध्ये पसरला नंतरच या फवारणी यंत्राचा उपयोग करणार आहे का असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
2.0 लॉक डाऊन उघडल्यानंतर व आई आंबेच्या नवरात्राच्या पहिल्या माळे पासून हे भाविक श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर येण्यास सुरुवात झाली नवरात्राचे पूर्ण यात्रा झाले नंतर दिवाळीच्या सुट्ट्या, नाताळच्या सुट्ट्या या कालावधीमध्ये सप्तशृंगी गडावर लाखो भाविक हे आतापर्यंत येऊन गेले परंतु सप्तशृंगी गड ग्रामपंचायतला एकदाही गावामध्ये फवारणी करण्याचे सुचले नाही व यामुळे सप्तशृंगी गडावरील गावकऱ्यांना वाईट वाटत आहे असे गावकऱ्यांनी सांगितले व 50 हजार खर्च करून ग्रामपंचायतीने हे फवारणी यंत्र स्व मालकीचे विकत घेऊन याचा जर एकदाच वापर करायचा होता तर ग्रामपंचायतच्या फंडामधून 50 हजार का खर्च केले असा प्रश्न गडावरील ग्रामस्थ व स्थानिक पत्रकारांना पडला आहे आता यानंतर ग्रामपंचायत यावर काय निर्णय घेते असा प्रश्न ग्रामस्थ व स्थानिक पत्रकारांना पडला आहे.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....