साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते व गेल्या दोन वर्षांनंतर गडावर परंपरेनुसार दुर्गाअष्टमीला श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर पालखी मिरवणूक सोहळा पार पडला. या निमित्त श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात आई भगवतीची पालखी पूजा पुजारी श्री चैतन्य दीक्षित यांच्या हस्ते करून शिवालय तलाव येथे पालखीचे विधीवत पूजा व आरती करण्यात आली. यानंतर पहिली पायरी या ठिकाणावरून दुबे गल्ली येथून रोपवे ट्राली अशी पालखीची मिरवणूक काढून सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट मध्ये आल्यानंतर या पालखीची सांगता झाली.
पालखी मिरवणूक प्रसंगी रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती त्याचबरोबर पालखीवर फुलांचा वर्षांव करुन भाविकांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे कर्मचारी जनसंपर्क अधिकारी श्री भिकन वाबळे, श्री राज जोशी, श्री शाम पवार, सुरक्षा अधिकारी श्री यशवंत देशमुख, लेखा विभाग प्रमुख श्री भरत शेलार, श्री पंकज पाटील,श्री सोमनाथ महाले, श्री पोपट ठाकरे, इस्टेट कस्टोडियन श्री पगार, श्री संतोष पाटील, श्री राजू पवार, श्री किरण राजपूत, शांताराम बर्डे, श्री संदीप गवळी व सर्व कर्मचाऱ्यांसोबत सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ तथा भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….