सप्तशृंगी गडा | सप्तशृंगी गडावर दारुबंदीसाठी महिला आक्रमक… पंचायत वर गुन्हा दाखल करण्याचे संकेत…

0
 सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
सप्तशृंगी गडावरील दारू बंद न झाल्यास पंचायत वर गुन्हा दाखल करण्याचे महिलांकडून संकेत
              साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन असलेल्या दिवशी श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस सप्तशृंगी गडावरील आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या व त्यांनी ग्रामसभेत अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला की श्री क्षेत्र सप्तशृंगी गड हे आई भगवतीचे पावन तीर्थ व त्याचबरोबर धार्मिक स्थळ आणि पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी हजारो लोक दररोज आई भगवतीच्या चरणी नतमस्तक होतात व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्यामुळे येथे अनेक भाविकांचे रोज नवसपूर्ती होत असते व याच बरोबर लहान मुले व महिला मोठ्या संख्येने उपस्थित असल्यामुळे सप्तशृंगी गडावर मद्यपान विक्री ही तात्काळ बंद करावी अन्यथा सप्तशृंगी गड ग्रामपंचायत वर गुन्हा दाखल करण्याचे आक्रमक संकेत व दुर्गा अवतारी अशा महिलांनी ग्रामसभेत दिले यावेळेस सप्तशृंगी गडावरील मद्यपान विक्री बंद होण्याकरिता अनेक महिलांनी पुढाकार घेतला मद्यपान विक्री ही सप्तशृंगी गडावर सन 1975 साली या ठिकाणी मद्यविक्रीला परवानगी देण्याचा ग्रामपंचायतीला अधिकार नसल्याची तरतूद १९७५ साली देवी संस्थान व ग्रामपंचायत स्थापनेवेळी तत्कालीन जिल्हा न्यायाधीशांनी करून ठेवलेली आहे. या तरतुदीनुसार सप्तशृंग गावठाण हद्दीत व घाटात कुठेही १० किमीच्या आत मद्यविक्रीला परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे.
   
          सप्तशृंगी गडावर 80 टक्के आदिवासी समाज असल्यामुळे लहान मुले, महिला, वृद्ध हे व्यसनाच्या आधीन जाताना दिसून येत आहे व यामुळे सप्तशृंगी गडावर अनेक संसार यामुळे उद्ध्वस्त होत चालले आहे व काही आत्महत्येस प्रवृत्त होत आहे यामुळे दिनांक 1 मे रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये दारू, गांजा, यासारखे आमली पदार्थ त्वरित बंद करावे 2 दिवसाच्या आत बंद न झाल्यास महिला नांदुरी येथे सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी व सप्तशृंगी गडावरती येणाऱ्या मार्गावर ठिय्या आंदोलन करण्याचा आक्रमक इशारा महिलांनी यावेळेस दिला दरम्यान, काही वर्षांपासून राजकीय व्यक्तींकडून गडावर मद्यविक्री सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, येथील महिलांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध करत हा प्रयत्न हाणून पडला. यावेळेस ग्रामसभेला सरपंच रमेश पवार, उपसरपंच मनीषा गवळी, सदस्य संदीप बेनके, राजेश गवळी, बेबीबाई जाधव, अजय दुबे, शोभा माळी, ताईबाई पिंपळे, अनिता बर्डे, आशाबाई जहागीरदार, मीना बोर्डे, सीमा गांगुर्डे, सविता थविल, ग्रामसेवक संजय देवरे सह आदी उपस्थित होते.

            सप्तशृंगगड हे पवित्र स्थान आहे. याठिकाणी मोठया प्रमाणावर अवैध दारू विक्री चालते. आज ग्रामसभेत बीयरच्या दुकानासाठी अर्ज आला म्हणेच गडावर कोणीही येते आणि ठराव करून गावाला दारूचे अड्डा बनवण्याचा कट करण्यात येत आहे. आम्ही सर्व १०० ते १५० महिलांनी हा ठराव ग्रामसभेत रद्द केला आहे. यापुढे असा ठराव करणार्यांना अद्दल घडल्याशिवाय राहणार नाही.
- शोभा माळी, अध्यक्ष.

            दुर्गा महिला गट सप्तशृंगी गडावर ग्रामपंचायत मध्ये महिला ग्रामसभा घेण्यात आली त्याबैठकीत बियर शॉपी संदर्भात विशेष चर्चा झाली मात्र सप्तशृंगी गडाचे महिलांनी बियर शॉपी बद्दल ग्रामपंचायत ठराव रद्द करण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी उपजिल्हा अध्यक्ष या नात्याने महिलांना समर्थन दिले.
-अजय दुबे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी उपजिल्हा उपाध्यक्ष, सप्तशृंग गड

MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !