सप्तशृंगी गड | सप्तशृंगी गडावर पोलिसात नोंद न करताच ग्रामपंचायतने केला बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावली...

0
सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
SPEED NEWS 

            साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गड हे पवित्र तीर्थस्थान मानलं जातं इथे जर अशा गोष्टी होत राहिल्या तर भाविकांचा सप्तशृंगी गडाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल सप्तशृंगी गडावर शिवालय परिसरात मंमादेवी चौकात हॉटेल व्यवसाय काम करणारे लक्ष्मण गायकवाड यांंच्या दुकानात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून काम करत असणारे जळगाव येथील उत्तम मोतीराम कोळी वय अंदाजे 60 ते 65 राहणार भोलानगर आसोदा, या इसमाचा रात्री दुकानाबाहेर झोपलेला असताना मृत्यू झाला, असे गायकवाड यांचे म्हणणे आहे ही घटना ग्रामपंचायतीला माहीत झाल्यानंतर मृतदेहाची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून परस्पर विल्हेवाट लावायची घाई का केली याबाबत पोलिसांना का कळवले नाही व त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना का कळवले नाही, याबाबत ग्रामस्थांकडून संशय व्यक्त केला जात असून त्वरित ग्रामपंचायतीच्या कचरा वाहून येणार्‍या ट्रॅक्टरमधून त्या इसमाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाण्यात आला. मृतदेहाचा पंचनामा पोलिसांना बोलावून करण्यात आला नाही. तसेच मृतदेह कळवण उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठीही पाठवला गेला नाही. असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे दरम्यान बेवारस व्यक्तीच्या मृत्यूची नोंद नांदूरी येथील पोलिसांकडे झाली का, याची माहिती दूरध्वनीवरून विचारली असता त्यांनी याबाबत आमच्या दप्तरी कुठलीही नोंद नसल्याचे सांगितले. याबाबत कळवण पोलिस काय कारवाई करतात, याबाबत ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !