लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर प्रशासनाने तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सप्तशृंगी देवी दर्शनासाठी पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहे आई भगवती चे दर्शन आता लस घेतलेल्यानाच येणार असून 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक व 10 वर्षाखालील बालकांना मंदिरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे शासनाच्या मंदिर दर्शनासाठी जारी केलेल्या नियमावलीनुसार विश्वस्त संस्थेने कोविंड अनुवांशिक बाबींची पूर्तता करताना केंद्र व राज्य शासनाच्या सर्व आदेशाची पूर्तता केली असून भाविकांनी गर्दीच्या नियोजनात आवश्यक ते सहकार्य मिळावे या हेतूने विश्वस्त संस्थेने दर्शन पास उपलब्ध करून दिला आहे भाविकांनी ई दर्शन ऑनलाईन दर्शन पासच्या माध्यमातून दर्शन सुविधा उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे तसेच लसीकरणाचे किमान एक किंवा दोन डोस पूर्ण केलेल्या भाविकांना आई भगवतीच्या मंदिरात प्रवेश दिला जाईल ज्या भाविकांना आई सप्तशृंगी मंदिर दर्शन रांगेत रोपवे अथवा पायी प्रवेश करायचा असेल त्यांना लसीकरणाचे तपशील प्रवेशद्वारावर उपस्थित कर्मचाऱ्यांकडे दाखवावा लागेल 10 वर्ष पेक्षा कमी व तसेच 65 वर्षापेक्षा अधिक वयाच्या भाविकांना मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला आहे मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग राखण्यास, कोवींड नियमावलीचे पालन बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने दिली आहे.
ॲड दीपक पाटोदकर
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....