नांदुरी/माय मराठी एक्सप्रेस
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर मध्यमवर्गी घरामध्ये जन्मलेल्या ह. भ. प. ज्ञानेश्वरी ताई या अगदी अल्प वयात कीर्तनकार झाल्या याचे कारण असे की घरात ज्ञानेश्वरी ताईंचे आजोबा हे घरामध्ये हरिपाठ व कीर्तन करत असे त्यामुळे ज्ञानेश्वरी ताईंना त्यांच्या लहानपणातच किर्तनाचा छंद हा लागला आहे व हाच छंद पुढे जोपासन्या करिता ज्ञानेश्वरी ताई या आज जागोजागी किर्तन व प्रबोधनाचे कार्यक्रम करत आहेत याच अनुषंगाने.
दिनांक २७-७-२०२१ रोजी नांदूर येथे सप्तश्रुंगी वृद्धाश्रम व अनाथालय येथे ह. भ. प. ज्ञानेश्वर ताई यांच्या हस्ते कै. रजनी दिनकर निकम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून ज्ञानेश्वरी ताईंच्या मधुर वाणीतून संगीत प्रवचनाचा कार्यक्रम समस्त नांदुरी वासी यांनी व वृद्धाश्रमातील लोकांनी आनंद घेतला त्याचप्रमाणे सप्तशृंगी वृद्धाश्रम व अनाथालय येथे ह. भ. प. ज्ञानेश्वर ताई यांच्या हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले यावेळेस पंचक्रोशीतील असंख्य भाविक उपस्थित होते ह. भ. प. कुमारी ज्ञानेश्वरी ताई यांचे गुरु अनारै महाराज हे आहे आणि गुरूंच्या आशीर्वादाने ज्ञानेश्वरी ताई या अनेक ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम करत असतात.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....