सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
"ताठ होतील माना
उंच होतील नजरा
या रयतेच्या राजाला
माझा मानाचा मुजरा"
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर वर्षानुवर्ष परंपरा चालत असलेली परंपरा याही वर्षी अगदी उत्साहात साजरी झाली श्री सप्तशृंगी गडावर यावर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधीपूर्वक पूजन श्री ज्योतिषाचार्य पाठक गुरुजी यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले याप्रसंगी युवा सेना चे अध्यक्ष श्री नवनाथ बेनके यांनी विधीपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पुजा केली या वेळेस सप्तशृंगी गडावरील ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, साई बेनके, निलेश साळुंखे, गणेश बर्डे, प्रसाद दीक्षित, राजू अष्टेकर, पत्रकार निलेश कदम, आनंद वाघ, पुरोहित दीक्षित, शिवभक्त उपस्थित होते.
"प्रौढ प्रताप पुरंदर"
"महापराक्रमी रणधुरंधर"
"क्षत्रिय कुलावतंस"
"सिंहासनाधीश्वर महाराज
"श्रीमंत "श्री" "श्री" "श्री"
"छत्रपती शिवाजी महाराज"
"जयंती निमित्त
माय मराठी एक्सप्रेस कडून
त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा…"
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....