सप्तशृंग गड/माय मराठी एक्सप्रेस
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेच्या कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा शनिवार, दिनांक ११/०६/२०२२ रोजी फ्युनिक्युलर रोप-वे प्रकल्प येथे मा. मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई (महाराष्ट्र राज्य) मा. श्री दीपांकर दत्ता यांच्या शुभहस्ते व न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई (महाराष्ट्र राज्य) मा. श्री. मकरंद एस. कर्णिक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक मा. श्री श्रीचंद जगमलानी साहेब व जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक तथा अध्यक्ष श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट मा. श्री वर्धन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्याला सौ. दत्ता, सौ. कर्णिक, सौ. जगमलानी, सौ. देसाई, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त मंडळ विश्वस्त तथा तहसीलदार कळवण मा.श्री. बंडू. आ. कापसे, विश्वस्त मा.ॲड. श्री. दिपक राजाराम पाटोदकर, विश्वस्त मा.ॲड. श्री. ललित रवींद्र निकम, विश्वस्त मा.डॉ. श्री. प्रशांत सुकदेव देवरे, विश्वस्त मा.सौ. मनज्योत युवराज पाटील, विश्वस्त मा.श्री. भूषणराज शशिकुमार तळेकर, नाशिक जिल्हा न्यायालयाचे व्यवस्थापक मा.श्री.अशोक दारके, न्यायालयाचे राजशिष्टाचार अधिकारी मा.श्री. नितीन आरोटे, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक मा श्री. सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी मा श्री.भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी श्री. भिकन वाबळे, श्री. नानाजी काकळीज, श्री. प्रकाश जोशी, रोप-वे प्रकल्प व्यवस्थापक श्री. राजीव लुंबा, श्री सुयोग विनोद शेलार, कळवण व त्याच बरोबर सप्तशृंगगड ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा. मुख्य न्यायमुर्ती श्री दीपांकर दत्ता, न्यायमुर्ती मा. श्री. मकरंद कर्णिक, प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा श्री श्रीचंद जगमलानी तसेच न्यायाधीश श्री वर्धन देसाई आदींनी श्री भगवतीची विशेष संकल्प आरती करत सपत्नीक दर्शन घेतले. तसेच विश्वस्त संस्थेच्या सेवा व सुविधांचा तसेच भविष्यकालीन नियोजित प्रकल्पनांचा आढावा घेतला. विश्वस्त संस्था करत असलेल्या विविध उपक्रमाचे यथार्थ कौतुक करत भविष्यातील कार्यास विशेष शुभेच्छा देवू केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन व्यवस्थापन, अधिकारी व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.
MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….